Next

डोंबिवली टिळक पुतळा ते मशाल चौक या दरम्यान असलेल्या रस्त्याची ठेकेदाराने केली दुरुस्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 08:21 PM2019-07-15T20:21:31+5:302019-07-15T20:22:11+5:30

डोंबिवली : एकीकडे शहरातील हमरस्त्यावर ठिकठीकाणी खड्डे पडलेले असताना वाहनचालकांचे कंबरडे मोडले आहे. वाहनांचे पार्टस बदलण्याचा खर्च आणि भुर्दंड ...

डोंबिवली : एकीकडे शहरातील हमरस्त्यावर ठिकठीकाणी खड्डे पडलेले असताना वाहनचालकांचे कंबरडे मोडले आहे. वाहनांचे पार्टस बदलण्याचा खर्च आणि भुर्दंड नागरिकांच्या अंगावर पडला आहे. असे असतानाच टिळक पुतळा ते मशाल चौक या दरम्यान असलेल्या रस्त्याचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराने मात्र आपली जबाबदारी ओळखत जेथे खड्डे पडले आहेत तेथे मास्टक पद्धतीने रस्ते चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न केले आहेत.