Next

Martyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 02:17 PM2018-08-09T14:17:50+5:302018-08-09T14:18:10+5:30

  जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना 3 जवानांसह मेजर कौस्तुभ राणे शहीद झाल्यानं सर्वत्र शोककळा पसरली आहे. मीरारोडचे रहिवासी असलेले कौस्तुभ राणे यांच्या हौतात्म्यामुळे शहर ...

 जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना 3 जवानांसह मेजर कौस्तुभ राणे शहीद झाल्यानं सर्वत्र शोककळा पसरली आहे. मीरारोडचे रहिवासी असलेले कौस्तुभ राणे यांच्या हौतात्म्यामुळे शहर शोकसागरात बुडालं असताना भाजपाकडून मात्र नगरसेवकाचा वाढदिवस अगदी धुमधडाक्यात साजरा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी  भाजपा  नगरसेवकाचा वाढदिवस डिजेच्या दणदणाटात साजरा झाला, तिथपासून  शहीद  राणे यांचं घर हाकेच्या अंतरावर आहे.