Next

पुराच्या पाण्यात वाहून जाणारा तरुण थोडक्यात बचावला; सोहोली-कडेगाव येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 01:04 PM2019-07-31T13:04:45+5:302019-07-31T13:06:41+5:30

एक तरुण दुचाकीसह वाहून गेला. या तरुणाला पोहता येत होते.त्यामुळे त्याने ओढ्यातील  झाडांचा आधार घेतला आणि ओढ्याच्या उथळ भागातून पोहत सुखरूप  बाहेर आला.

कडेगाव : मुसळधार पावसामुळे कडेगाव तालुक्यातील महादेव ओढ्याला पूर आला. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास या पुराचे पाणी कडेगाव सोहोली रस्त्यावरील या ओढ्याच्या पुलावरून जोराने  वाहत होते.यावेळी  एक तरुण दुचाकीसह वाहून गेला. या तरुणाला पोहता येत होते.त्यामुळे त्याने ओढ्यातील  झाडांचा आधार घेतला आणि ओढ्याच्या उथळ भागातून पोहत सुखरूप  बाहेर आला.