Next

शिवप्रतिष्ठानच्या मदत कार्याला जवानांचा सॅल्यूट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 02:26 PM2019-08-13T14:26:24+5:302019-08-13T14:30:13+5:30

सांगली - कोल्हापूर आणि सांगलीतील भीषण पूरस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र पुढे सरसावला आहे. त्यामध्ये, स्थानिक कोल्हापूर आणि सांगलीतील नेते, ...

सांगली - कोल्हापूर आणि सांगलीतील भीषण पूरस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र पुढे सरसावला आहे. त्यामध्ये, स्थानिक कोल्हापूर आणि सांगलीतील नेते, सामाजिक संघटना, समाजसेवक यांसह अनेकांनी मदतीसाठी स्वत:ला झोकून देऊन काम केले. मात्र, सांगलीकर असलेले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संघटनेचे संभाजी भिडे कुठे आहेत? असा प्रश्न अनेकांनी सोशल मीडियावर उपस्थित केला होता. या प्रश्नाला आता खुद्द सैन्यातील जवानांनी सॅल्यूट करुन उत्तर दिले आहे.