Next

Maharashtra Bandh : सांगलीतील मांगलेमध्ये एसटी बस पेटविली, प्रवाशी बचावले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 03:47 PM2018-07-26T15:47:43+5:302018-07-26T15:53:02+5:30

सांगली : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने सुरु असलेल्या आंदोलनाची धग सांगली जिल्ह्यात गुरुवारीही कायम ...

सांगली : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने सुरु असलेल्या आंदोलनाची धग सांगली जिल्ह्यात गुरुवारीही कायम राहिली. मांगले (ता. शिराळा) येथे प्रवाशासह बस पेटवून देण्यात आली. काही ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे बसमधील २५ प्रवाशांना तातडीने सुखरुप बाहेर काढण्यात यश आले.