Next

शाहू, फुले, आंबेडकर आम्ही सारे दाभोलकर, अशा घोषणा देत रत्नागिरीत अंनिसची रॅली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2018 03:40 PM2018-02-25T15:40:55+5:302018-02-25T15:41:11+5:30

रत्नागिरी - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक २४ व २५ फेब्रुवारी रोजी रत्नागिरीत होत असून त्यानिमित्त आज ...

रत्नागिरी - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक २४ व २५ फेब्रुवारी रोजी रत्नागिरीत होत असून त्यानिमित्त आज रॅली काढण्यात आली. अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, राज्य प्रधान सचिव सुशीलाताई मुंडे, राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर, राज्य सरचिटणीस शहाजी भोसले व  प्रा. डॉ. नितीन शिंदे यांच्यासह रत्नागिरीतील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. शाहू, फुले, आंबेडकर आम्ही सारे दाभोलकर अशी घोषणा देत ही रॅली काढण्यात आली. यावेळी अंनिस रत्नागिरी जिल्ह्याचे कार्याध्यक्ष विनोद वायंगणकर, जिल्हा प्रधान सचिव सचिन गोवळकर व नारायनसिंह राजपूत यांच्यासह अनेक रत्नागिरीकर सहभागी झाले होते.