Next

९९ वर्षांच्या आजीने सूर्यनमस्कार घालून केले अचंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 06:25 PM2018-01-17T18:25:13+5:302018-01-17T18:25:30+5:30

रत्नागिरी - कशेळी (ता. राजापूर) येथील कनकादित्य सूर्यमंदिरात पुणे येथील चैतन्य योगसाधना आणि कनकादित्य मंदिराच्या विश्वस्त मंडळाकडून सूर्यनमस्काराचे आयोजन ...

रत्नागिरी - कशेळी (ता. राजापूर) येथील कनकादित्य सूर्यमंदिरात पुणे येथील चैतन्य योगसाधना आणि कनकादित्य मंदिराच्या विश्वस्त मंडळाकडून सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोळंबे (ता. रत्नागिरी ) येथील ९९ वर्षांच्या दामले आजींनी सूर्यनमस्कार घालून सर्वांना अचंबित केले. या उपक्रमातून १ लाख ७५ हजार सूर्यनमस्कारांचा जागतिक विक्रम नोंदविण्यात आला आहे. २० शाळांतील १८०० विद्यार्थी आणि नागरिकांनी आदित्ययागातून हा पराक्रम केला आहे.