Next

राष्ट्रवादीची साथ सोडणार नाही; कार्यकर्त्यांनी घेतली शपथ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 01:50 PM2019-08-01T13:50:43+5:302019-08-01T13:51:09+5:30

पुणे - गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत अनेक बडे नेते सत्ताधारी पक्षात प्रवेश करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला ...

पुणे - गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत अनेक बडे नेते सत्ताधारी पक्षात प्रवेश करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला एका मागोमाग धक्के बसत आहे. शिवेंद्रराजे भोसले, मधुकर पिचड, संदीप नाईक, चित्रा वाघ, विजयसिंह मोहिते पाटील अशा अनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे पुण्यात आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना शपथ देऊन पक्षासोबत एकनिष्ठ राहावं असं आवाहन करण्यात आले. यावेळी प्रवक्ते अंकुश काकडे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.