Next

बारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 02:42 PM2019-01-23T14:42:27+5:302019-01-23T14:48:36+5:30

पुणे: सागरी प्रदूषण आणि त्यामुळे संकटात सापडलेलं समुद्री जीवन ही संपूर्ण जगासमोरील अतिशय गंभीर समस्या आहे. मात्र यावर पुण्यात ...

पुणे: सागरी प्रदूषण आणि त्यामुळे संकटात सापडलेलं समुद्री जीवन ही संपूर्ण जगासमोरील अतिशय गंभीर समस्या आहे. मात्र यावर पुण्यात राहणाऱ्या एका 12 वर्षीय मुलानं भन्नाट उपाय शोधून काढला आहे. हाजिक काजी नावाच्या मुलानं एका जहाजाचं मॉडेल तयार केलं आहे. हे जहाज जल प्रदूषण कमी करण्यात आणि सागरी जीवन वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.