Next

मध शुद्ध आहे कि भेसळयुक्त कसे ओळखाल? How To Differentiate Between Pure And Adulterated Honey?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 06:41 PM2020-12-16T18:41:27+5:302020-12-16T18:41:51+5:30

गेल्या काही दिवसांपासून मध शुद्ध आहे कि भेसळयुक्त यावर चर्चा रंगलीय. देशातील अनेक मोठ्या कंपन्यांच्या मधामध्ये भेसळ असल्याची माहिती समोर आली आहे. सेंटर फॉर सायन्स अँड एनवायरमेंटनं (CSE) केलेल्या तपासातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मध तयार करणाऱ्या सर्वाधिक कंपन्या मधामध्ये साखर मिसळत असल्याची माहिती या तपासातून मिळत आहे. CSEने 13 छोट्या मोठ्या कंपन्यांच्या मधाचे नमूने तपासले. या कंपन्यांच्या मधात 77 टक्क्यांपर्यंत भेसळ असल्याचं दिसून आलं. मधाचे एकूण 22 सँपल्सपैकी फक्त पाच सँपल्स चाचणीत यशस्वी ठरले आहेत. आता मध शुद्ध आहे की भेसळयुक्त?; ते घरच्या घरी कसं चेक करायचं ते पाहुयात आजच्या video मध्ये-