Next

मेनूकार्डवर फूड आणि किंमत शिवाय आता कॅलरीज सुद्धा असणार | FSSAI New Rules For Hotels- Restaurant

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 07:03 PM2020-12-16T19:03:42+5:302020-12-16T19:04:53+5:30

फिटनेस सध्या एक महत्वाचा विषय झालाय. तुम्ही जर fintess freak असला आणि बाहेरच खायला खूप आवडेल असेल तर आजचा video तुम्ही पाहायलाच हवा. आतापर्यंत हॉटेल रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर मेन्यू कार्डमध्ये फक्त पदार्थाचं नाव आणि त्याची किंमत एवढंच नमूद केलेलं असायचं. मात्र आता संबंधित पदार्थामध्ये किती कॅलरीज आहेत आणि पोषण तत्वे कोणती आहेत, याची माहिती मेन्यू कार्डवर असणार आहेत. यामुळे लोकांना जेवढ्या कॅलरीजचं जेवण खायचं असेल तेवढ्याच कॅलरीज ते खाऊ शकतील किंबहुना ऑर्डर करु शकतील. लोकांना पहिलंच जर कॅलरीजविषयी कळालं तर त्यांना पाहिजे तेवढ्या कॅलरीज जेवण करता येणं सोपं होईल. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अ‌ॅथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात FSSAI ने मोठं पाऊल उचललं आहे. सरकारच्या या आदेशानुसार आता नवीन मेन्यूकार्डमध्ये हॉटेल-रेस्टॉरंट मालकांना अन्नाची न्यूट्रीशन व्हॅल्यू (पोषण मूल्य) लिहावी लागणार आहे. नेमका हा बदल का करण्यात आला? याचा काय फायदा होणार? पाहुयात सविस्तर रित्या