Next

पनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 03:31 PM2018-10-21T15:31:23+5:302018-10-21T15:39:45+5:30

पनवेल टर्मिनलमध्ये दोन वाजण्याच्या सुमारास बेवारस बॅग आढळल्याने खळबळ उडाली आहे. यापुर्वीच लांब पल्याच्या ट्रेनमध्ये घातपात घडविण्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती.

नवी मुंबई - पनवेल टर्मिनलमध्ये दोन वाजण्याच्या सुमारास बेवारस बॅग आढळल्याने खळबळ उडाली आहे. यापुर्वीच लांब पल्याच्या ट्रेनमध्ये घातपात घडविण्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती. बेवारस बॅग आढळल्याने तत्काळ बाॅम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले आहे. संपुर्ण स्टेशन खाली करून तपास सुरू आहे. याठिकाणी येणाऱ्या सर्व ट्रेनचीही श्वानपथकाकडून पाहणी केली जाणार आहे. बॅगेत छोटी गॅस शेगडी आहे की संशयास्पद काही वस्तू आहे याची पाहणी केली जात आहे. या घटनेने पनवेल स्टेशन परिसरात खळबळ उडाली आहे.