Next

सहा गाड्यांच्या विचित्र अपघातात 6 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 12:41 PM2018-03-22T12:41:45+5:302018-03-22T12:42:12+5:30

नवी मुंबई,  वाशी प्लाझा ब्रीज परिसरात पुणे लेनवर बुधवारी (21 मार्च) सहा गाड्यांचा विचित्र अपघात झाला. उशिरा रात्री 2.15 ...

नवी मुंबई,  वाशी प्लाझा ब्रीज परिसरात पुणे लेनवर बुधवारी (21 मार्च) सहा गाड्यांचा विचित्र अपघात झाला. उशिरा रात्री 2.15 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात डम्पर व HP गॅस टँकरमध्ये स्कोडा गाडी येऊन दबली गेली. या अपघातात एकूण 6 जखमी झाले आहेत. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान या अपघातामुळे गुरुवारी सकाळपर्यंत परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

टॅग्स :अपघातAccident