Next

Kanhaiya Kumar, Gujarat MLA Jignesh Mevani To Join Congress : भाजपची डोकेदुखी वाढली | India News

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 10:23 AM2021-09-27T10:23:39+5:302021-09-27T10:24:16+5:30

JNU विद्यापीठातल्या कारवाईनंतर देशभरात पोहचलेला कन्हैय्या कुमार आणि गुजरातचा सामाजिक कार्यकर्ता जिग्नेश मेवाणी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या दोघांच्या प्रवेशासाठी दिवसही खास निवडण्यात आलाय. २८ सप्टेंबरला म्हणजे शहीद भगत सिंह जयंतीच्या मुहूर्तावर कन्हय्या कुमार आणि जिग्नेश मेवाणी काँग्रेसवासी होणार आहेत. आता हे दोन नेते काँग्रेसमध्ये आल्यानं काँग्रेसला खरंच बळ मिळेल का, काँग्रेसमधल्या जुन्याजाणत्या नेत्यांना यांची कार्यशैली पटेल का, राहुल गांधींसोबत यांचं ट्युनिंग कसं असेल हे आपल्याला जाणून घ्यायचंय पुढच्या ३ मिनिटात त्यामुळे रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा.