Next

तहानलेल्या बिबट्यावर लोकांनी केली दगडफेक 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 02:31 PM2019-05-03T14:31:11+5:302019-05-03T14:31:32+5:30

अझहर शेख,   नाशिक - तहानलेला बिबट्या नाशिक तालुक्यातील गिरणारे गावापासून पुढे असलेल्या लाडची गावाच्या शिवारातील एका लहानशा तलावावर ...

अझहर शेख,   नाशिक - तहानलेला बिबट्या नाशिक तालुक्यातील गिरणारे गावापासून पुढे असलेल्या लाडची गावाच्या शिवारातील एका लहानशा तलावावर येतो आणि शेकडो लोक त्या दिशेने धाव घेऊन बिबट्यावर दगड भिरकावून त्याला सळो की पळो करून सोडतात. बिबट्याला तहान भागविणे तर दूर मात्र जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पळावे लागते. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना देखील त्याला रेस्क्यू करताना अडचणी निर्माण झाल्या. अखेर पाच तासांच्या प्रयत्नानंतर तहानलेला बिबट्या जेरबंद करण्यास यश मिळाले. लोकांनी केलेले वर्तन माणुसकीला शोभणारे नव्हते हेच यावेळी अधोरेखित झाले.