Next

पालकमंत्री सिन्नरच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 03:10 PM2019-05-06T15:10:28+5:302019-05-06T15:16:18+5:30

सिन्नर( नाशिक ) - पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सिन्नर तालुक्यतील पांगरी येथून दुष्काळ पाहणी दौऱ्यास प्रारंभ केला आहे. जनावरांना ...

सिन्नर( नाशिक ) - पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सिन्नर तालुक्यतील पांगरी येथून दुष्काळ पाहणी दौऱ्यास प्रारंभ केला आहे. जनावरांना चारा पाणी द्या, बेरोजगारांना काम द्या असा आक्रोश शेतकरी करीत होते. आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, उदय सांगळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दादाजी जाधव यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी गाऱ्हाणे मांडले.