Next

#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट

By पवन देशपांडे | Published: October 13, 2018 03:51 PM2018-10-13T15:51:27+5:302018-10-13T15:53:33+5:30

  ‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर त्या दिवशी  नाना पाटेकर  यांच्या व्हॅनिटी व्हॅनमधून अभिनेत्री  तनुश्री दत्ता  तावातावाने बाहेर आली आणि ...

 ‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर त्या दिवशी  नाना पाटेकर  यांच्या व्हॅनिटी व्हॅनमधून अभिनेत्री  तनुश्री दत्ता  तावातावाने बाहेर आली आणि राडा सुरू झाला. तनुश्री नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य आणि इतरांना नानांची तक्रार करत मोठमोठ्या आवाजात बोलत होती. ती घाबरलेली होती. व्हॅनिटी व्हॅनमध्ये जे घडले धक्कादायक होते, असे त्या दिवशी सेटवर असलेले स्पॉटबॉय रामदास बोर्डे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.