Next

उर्मिला मातोंडकर यांच्यासमोर भाजपा कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 02:19 PM2019-04-15T14:19:49+5:302019-04-15T14:23:51+5:30

मुंबई : एकीकडे  भाजपाच्या  महिला उमेदवारांना अश्लील टिप्पणीला सामोरे जावे लागत आहे. तर दुसरीकडे  काँग्रेसच्या  उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या ...

मुंबई : एकीकडे  भाजपाच्या  महिला उमेदवारांना अश्लील टिप्पणीला सामोरे जावे लागत आहे. तर दुसरीकडे  काँग्रेसच्या  उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आणि अभिनेत्री  उर्मिला मातोंडकर  यांना  भाजपाच्या  कार्यकर्त्यांच्या हुल्लडबाजीचा सामना करावा लागला आहे. यावर मातोंडकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस संरक्षणाचीही मागणी केली आहे. या हुल्लडबाजींमध्ये एक महिला प्रवासी पडल्याने जखमी झाली आहे. तर या कार्यकर्त्यांना  काँग्रेसने  चोप दिला आहे.