Next

जगभरात 'इको ब्रीक्स'ची मागणी का वाढतेय? Waste Management | Ecobricks | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 10:45 AM2020-12-22T10:45:52+5:302020-12-22T10:46:38+5:30

आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तू या कुठे ना कुठे प्लास्टिकशी जोडल्या गेलेल्या आहेत, नाही का? बघा ना, दिवसाची सुरुवातच होते ती दुधाच्या पिशवी पासून... बिस्कीट, चिप्सचे रॅपर्स, ब्रेडचं पॅकेट, किराण्यातील प्लास्टिक, बाजारात खरेदीला गेलो की कोणत्या ना कोणत्या वस्तूला प्लास्टिक येतच चिटकून. मग आपण काय करतो तर हे प्लास्टिक थेट कचरापेटीत टाकतो. पण तुम्हाला माहितीये का? यापैकी निदान नव्वद टक्के प्लास्टिक तरी नॉन रिसायकलेबल म्हणजेच पुर्नवापर न करता येण्यासारखं असतं. आणि म्हणूनच प्लास्टिक कचरा हा दिवसेंदिवस आहे त्यापेक्षाही वाढताना दिसतोय. मग यावर उपाय काय? आहे ना उपाय... 'इको ब्रीक्स'. एक अशी संकल्पना की ज्यामुळे नॉन रिसायकलेबल कचऱ्याचं विघटन कसं करावं? हा प्रश्न पडत नाही. आपण पृथ्वीवर होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याला कुठे ना कुठे जबाबदार आहोत हा गिल्टही बाळगायची गरज पडणार नाही. चला तर मग बघूया की हे इको ब्रीक्स आपल्याला घरच्या घरी कसे पटापट बनवता येतील