Next

देवेंद्र फडणवीसांनी दिलेले दोन्ही पर्याय उत्पल पर्रिकरांनी नाकारले Utpal Parrikar Devendra Fadnavis

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 07:11 PM2022-01-21T19:11:00+5:302022-01-21T19:11:21+5:30

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गेले काही दिवस गोव्यात ठाण मांडून आहेत... गोवा विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आलेय... अशात गोव्यात पुन्हा भाजपची सत्ता आणण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर असेल... भाजपला यावेळी केवळ विरोधकांचंच नाही, तर पक्षांतर्गत बंडखोरांचं आव्हानही थोपवावं लागणार आहे... मुख्य म्हणजे ज्यांनी गोव्यात भाजपला नवा चेहरा दिला त्याच दिवंगत मनोहर पर्रिकरांच्या घरातून बंडाचं अस्त्र उपसलं गेलंय... कारण मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी वडिलांच्या पणजी मतदार संघावर दावा सांगितला... आणि भाजपने मात्र त्यांना डावलून काँग्रेसमधून भाजपत आलेल्या विद्यमान आमदारांनाच तिकीट दिलं... यांनतर देवेंद्र फडणवीस यांनी पर्रिकरांना दोन पर्याय आपण दिल्याचं सांगितलं होतं.. तेव्हा पर्रिकर या दोन पर्यायांबाबत काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागलं होतं.. पण आता त्यांच्या भूमिकेनंतर गोव्यातला फडणवीस-पर्रिकर संघर्ष अटळ दिसतोय... कारण उत्पल पर्रिकर यांनी थेट फडणवीसांना ठणकावलंय... नेमकं काय घडलंय? जाणून घेऊ... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा..