Next

सोमय्या कामाला लागले, जामीन मंजूर | Kirit Somaiya bail granted | Kirit Somaiya latest news

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 09:33 AM2021-10-06T09:33:05+5:302021-10-06T09:33:32+5:30

महाराष्ट्राच्या राजकारणात किरीट सोमय्या या नावाची चांगलीच दहशत निर्माण झालीय. आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करत अनेक नेत्यांना किरीट सोमय्यांनी अडचणीत आणलंय. त्यामुळे किरीट सोमय्या पुढचा आरोप कधी आणि कोणावर करतील याची धास्तीचं अनेक नेत्यांना आहे. पण या सगळ्यात किरीट सोमय्यादेखील अडचणीत सापडलेत. किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपांनंतर त्यांच्यावरदेखील खटले दाखल झाले होते. अशाच एका खटल्याप्रकरणात किरीट सोमय्यांना जामीन मंजूर करण्यात आलाय.