Next

अण्णांच्या समर्थनार्थ राळेगणसिद्धीत शोलेस्टाईल आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 03:30 PM2018-03-26T15:30:35+5:302018-03-26T16:13:45+5:30

पारनेर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्ली येथे विविध मागण्यांसाठी सुरु केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ राळेगणसिद्धी व परिसरातील ग्रामस्थांनी ...

पारनेर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्ली येथे विविध मागण्यांसाठी सुरु केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ राळेगणसिद्धी व परिसरातील ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी पारनेर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. तर राळेगणसिद्धीत तरुणांनी पाण्याच्या टाकीवर चढून सरकारविरोधात घोषणाबाजी सुरु केली आहे. जोपर्यंत अण्णांच्या मागण्या मंजूर होत नाही, तोपर्यंत टाकीवरुन खाली न उतरण्याचा इशारा तरुणांनी दिला आहे.