Next

'सब पुलीसवाले पैसे कमाने के लिये खडे है' म्हणत वाहतूक पोलिसाला 800 मिटर फरफटत नेले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 12:04 PM2021-10-22T12:04:27+5:302021-10-22T12:04:44+5:30

वाहतूक पोलिसांनी दंडाची रक्कम भरण्यास सांगितल्यानंतर होणारे वाद आता नित्याचे झाले आहेत..यातूनच पोलिसांवर हल्ले होण्याच्या घटना देखील वाढल्या आहेत.. त्यामुळे रस्त्यावर काम करताना वाहतूक पोलिसांना जीव मुठीत धरून काम करावं लागत आहे..पुण्यातल्या मुंढवा परिसरातून असाच एक प्रकार उघडकीस आलाय..नियमभंगांची थकलेली 400 रुपये रक्कम भरण्यास सांगितल्यानंतर एका कारचालकाने वाहतूक पोलिसाच्या अंगावर गाडी घालून 700 ते 800 मीटरपर्यंत फरपटत नेलं.