Next

महापालिकेतही NCPचे '100' नगरसेवक निवडून आणणारच, NCP नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला | PCMC | Pune

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 03:58 PM2022-01-21T15:58:38+5:302022-01-21T15:59:05+5:30

राज्यातील नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत.. भाजप आणि राष्ट्रवादीकडून आम्हीच नंबर वन असल्याचे दावे केले जात आहेत.. सर्वत्र जल्लोष सुरू आहे..प्रत्येक पक्षाचे नेते पदाधिकारी आपापल्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत आहेत.. पुणे जिल्ह्यातील देहू ग्रामपंचायतीचे नगरपंचायत मध्ये रूपांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक पार पडली.. या ठिकाणी भाजपचे माजी राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे आणि राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.. निकालाअंती 17 पैकी 14 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले.. तर भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.. राष्ट्रवादी काँग्रेसने एक हाती देहू नगरपंचायतीची सत्ता काबीज केली.. या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला.. भंडारा उधळत, फटाके फोडत, ढोल तशांच्या तालावर ठेका धरला.. या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास उंचावला असून त्यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकातही विजय पताका कायम ठेवण्याचा निर्धार केला आहे.