Next

चोरीला गेलेल्या गाण्याचा वाद मिटवला, यांनी मिटवला वाद |Controversy over the rights of Oh Sheth Song

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 01:58 PM2021-09-28T13:58:06+5:302021-09-28T13:58:50+5:30

'ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट’ या गाण्याने अल्पावधीतच रसिकांची मने जिंकली होती. या गाण्यामुळे गायक उमेश गवळी, संगीतकार प्रणिकेत खुळे आणि निर्मात्या संध्या केशे हे त्रिकूट महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले होते.. मात्र गेल्या काही महिन्यांपासून 'कॉपीराईट’च्या मुद्यावरून त्रिकूटामध्ये वादाची ठिणगी पडली अन् हा वाद इतका विकोपाला गेला की थेट हे गाणे यूट्यूबवरून काढून टाकण्यात आले. अखेर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या एकत्रित प्रयत्नामुळे महामंडळाच्या लवादासमोर हा गाण्याचा वाद मिटला. प्रणिकेत खुणे, संध्या केशे आणि उमेश गवळी यांच्यात गाण्याच्या कॉपीराईटवरून वाद झाला होता. हे गाणे यूट़्यबवरून काढून टाकल्यामुळे या तिघांचेही मोठे आर्थिक नुकसान होत होते. यामुळे संध्या केशे आणि प्रणिकेत खुणे यांनी फेसबूक लाईव्ह करत गाणे चोरीला गेल्याची तक्रार केली होती.