Next

आमदार सिद्धू न्यामगौडा यांचं अपघाती निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 02:48 PM2018-05-28T14:48:35+5:302018-05-28T14:57:08+5:30

विजयपूर जिल्ह्यातील जमखंडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धू न्यामगौडा यांचं  कार अपघातात निधन झालंय. दिल्लीहून गोव्यामार्गे आपल्या मतदारसंघात परतत असताना ...

विजयपूर जिल्ह्यातील जमखंडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धू न्यामगौडा यांचं  कार अपघातात निधन झालंय. दिल्लीहून गोव्यामार्गे आपल्या मतदारसंघात परतत असताना न्यामगौडा यांच्या इनोव्हा कारला पहाटे अपघात झाला. कारचा टायर फुटून ती पुलाच्या कठडयाला धडकली. या अपघातात आमदार सिद्धू न्यामगौडा यांच्या छातीला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात न्यामगौडा यांचे तीन सहकारी जखमी झाले.