Next

Parth Pawar यांच्या 'त्या' ट्विटनंतर चर्चांना उधाण Parth Pawar will fight again from Maval Loksabha

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 02:01 PM2021-11-23T14:01:24+5:302021-11-23T14:01:51+5:30

'पवार' हे महाराष्ट्रातील एक मोठं राजकीय घराणं. Sharad Pawar यांच्या घरातील कोणत्याच व्यक्तीने निवडणुकीत कधी पराभव पाहिला नव्हता. कधीच पराभव न पाहणाऱ्या पवार घराण्यातील पराभूत होणारी पहिली व्यक्ती म्हणजे Parth Pawar... मागील लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांचे पुत्र पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत पार्थ पवार यांचा पराभव झाला होता. त्यानंतर काही काळ राजकारणापासून दुरावलेले पार्थ पवार पुन्हा एकदा मावळ आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात सक्रिय झालेत.. ते पुन्हा एकदा मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.. एका ट्विटमधून त्यांनी स्वतः तसे संकेत दिले आहेत..