Next

9 वर्षाच्या चिमुकल्यानं शहीद वडिलांना दिला मुखाग्नी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 02:40 PM2019-12-19T14:40:07+5:302019-12-19T14:40:59+5:30

कोल्हापूरच्या हंबरेवाडीतील शहीद जवान ज्योतिबा चौगुले यांच्या पार्थिवावर उंबरवाडी येथे पोलीस आणि लष्कराच्या प्रत्येकी आठ जणांच्या तुकडीने बंदुकीच्या हवेत ...

कोल्हापूरच्या हंबरेवाडीतील शहीद जवान ज्योतिबा चौगुले यांच्या पार्थिवावर उंबरवाडी येथे पोलीस आणि लष्कराच्या प्रत्येकी आठ जणांच्या तुकडीने बंदुकीच्या हवेत 3 फैरी झाडून लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली. मात्र, यावेळी 9 वर्षाचा चिमुकला आपल्या वडिलांना मुखाग्नी देताना पाहून सारेच हळहळले.