Next

कोल्हापूरमधील सभेतून महायुतीच्या प्रचारसभेचा नारळ फुटला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 11:55 AM2019-03-25T11:55:03+5:302019-03-25T12:16:40+5:30

कोल्हापूर  - भाजप- शिवसेना युतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करवीरनगरीतून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे ...

कोल्हापूर  - भाजप- शिवसेना युतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करवीरनगरीतून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग रविवारी फुंकले. सभेद्वारे युतीने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. या सभेसाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते, सहकारमंत्री सुभाष देशमुख, कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत, दुग्धविकास, पशुपालनमंत्री महादेव जानकर, यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील युतीचे लोकसभा उमेदवार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.