Next

माकडीणीला लागला मांजरीचा लळा; पुरूषांसोबत जडली मैत्री तर महिलांशी वैर

By अझहर शेख | Published: October 4, 2017 07:51 PM2017-10-04T19:51:13+5:302017-10-04T19:51:44+5:30

नाशिक - माकड गावात किंवा शहरात येणे नवीन नाही; मात्र त्र्यंबकेश्वरपासून दहा किलोमीटरवर असलेल्या वेळुंजे गावात पाहुणी आलेल्या माकडीणीचा स्वभाव ...

नाशिक - माकड गावात किंवा शहरात येणे नवीन नाही; मात्र त्र्यंबकेश्वरपासून दहा किलोमीटरवर असलेल्या वेळुंजे गावात पाहुणी आलेल्या माकडीणीचा स्वभाव जरा अजबच आहे. माकडीणीला चक्क गावातील मांजरीच्या पिल्लाचा लळा लागला असून, माकड-मांजरीचे अनोखे प्रेम पहिल्यांदाच बघून गावकरी अवाक् झाले आहे; मात्र या माकडीणीचे महिलांशी मोठे वैर असल्याचे चित्र गावात पहावयास मिळते. यामुळे येथील महिलांनी या ‘पाहुणी’चा चांगलाच धसका घेतला आहे.(व्हिडिओ : अझहर शेख)