Next

Who Is Bigg Boss 3 contestant Sonali Patil? कोण आहे 'बिग बॉस'च्या घरातील पहिली स्पर्धक सोनाली पाटील?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 01:05 PM2021-09-20T13:05:43+5:302021-09-20T13:06:04+5:30

आली ठुमकत नार म्हणत घायाळ करणारी ही अभिनेत्री आहे सोनाली पाटील. सोनालीनं आपल्या अदांनी चाहत्यांना भुरळ पाडत धडाकेबाज परफॉर्मन्स सादर केला आणि बिग बॉसच्या घरात दमदार एन्ट्री केली.बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणारी ती पहिली स्पर्धक ठरली. सोनालीला याआधी कुठतरी पाहिल्यासारखं वाटतय ना. हो तुम्ही बरोबर ओळखलं आहे. सोनालीला आपण देवमाणूस या मालिकेत डॉ. अजितकुमार विरोधात वकिल म्हणून केस लढताना पाहिलं आहे.याशिवाय वैजू नंबर वन या मालिकेत ही ती झळकली होती. या मालिकांमुळे सोनालीचा स्वतचा असा एक चाहतावर्ग आहे. त्यातच सोनाली ही बिनधास्त,मनमोकळ्या स्वभावाची आणि बडबडी असल्यानं पहिल्याच दिवशी तिनं घरातल्यांचही लक्ष वेधून घेतलय. सोनाली तिच्या रिल्समुळे सोशल मीडियावर देखील प्रसिद्ध आहे.