Next

Sneha Wagh Life | 2 घटस्फोटांनंतर स्नेहा 11 वर्ष लहान अभिनेत्याला करत होती डेट? Bigg Boss Marathi 3

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 04:52 PM2021-09-24T16:52:23+5:302021-09-24T16:52:37+5:30

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एन्ट्री केल्यापासूनच अभिनेत्री स्नेहा वाघ व्यक्तिगत आयुष्यामुळे चर्चेत आहे. पहिला नवरा आविष्कारने बिग बॉसमध्ये एन्ट्री केल्यामुळे ती नाराज झाली होती. त्यानंतर दुसर्या नवऱ्यासोबतच्या घटस्फोटोमुळेही ती चर्चेचा विषय ठरली. पण ही पहिलीच वेळ नाही जेव्हा स्नेहा व्यक्तिगत आयुष्यामुळे चर्चेत आलीये. याआधी स्नेहाचे तिच्या सहकलाकारसोबत अफेअर असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या..ज्या निव्वळ अफवा असल्याचं स्नेहानं स्पष्ट केलं होतं . हे प्रकरण तेव्हाचं आहे, जेव्हा स्नेहाचा सहकलाकार फैजल खानने नच बलियेमध्ये सहभाग घेतला होता. फैजल तिच्यापेक्षा 11 वर्षांनी लहान आहे. या दोघांच्या अफेअरची चर्चा फैजलच्या गर्लफ्रेण्डने केलेल्या वक्तव्यामुळे रंगली होती. पण स्नेहा आणि फैजल या दोघांनीही ही अफवा असल्याचं म्हणत हे वृत्त फेटाळलं होतं. स्नेहा अत्यंत मेहनती कलाकार असून तिने अनेक मराठी-हिंदी मालिका गाजवल्या आहेत.

 

टॅग्स :स्रेहा वाघबिग बॉस मराठीSneha WaghBigg Boss Marathi