लाइव न्यूज़
 • 08:50 PM

  मुंबई - कोरोनाच्या अत्यंत धोक्याच्या वळणावर आपण उभे आहोत, आतापर्यंत जो संयम आणि शांतता दाखवली, तसाच दाखवा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 • 08:48 PM

  मुंबई - मराठा आरक्षणासाठी मी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना पत्र पाठवणार - मुख्यमंत्री

 • 08:48 PM

  मुंबई - केंद्र सरकारने कलम ३७० प्रमाणे संवेदनशीलता दाखवून मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा - मुख्यमंत्री

 • 08:47 PM

  मुंबई - आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींना आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय - उद्धव ठाकरे

 • 08:45 PM

  मुंबई - मराठा आरक्षणाबाबतची लढाई संपलेली नाही, आता कुठे न्याय मिळेल हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय - उद्धव ठाकरे

 • 08:44 PM

  मुंबई - निकालानंतर मराठा समाजाने दाखवलेला संयम कौतुकास्पद, त्यांचे आभार - उद्धव ठाकरे

 • 08:43 PM

  मुंबई - मराठा आरक्षणाची लढाई सर्वोच्च न्यायालयात समर्थपणे लढलो, निकालामुळे निराशा - उद्धव ठाकरे

 • 08:42 PM

  मुंबई - मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल निराशाजन - उद्धव ठाकरे

 • 08:41 PM

  मुंबई - आवश्यकता नसेल तर हॉस्पिटलमध्ये येण्याची गरज नाही. घरीच उपचार करण्यासाठी डॉक्टरांना सोबत घेण्याचा प्रयत्न - मुख्यमंत्री

 • 08:39 PM

  मुंबई - महाराष्ट्र येत्या काही दिवसांत ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालाच पाहिजे याबद्दल कटाक्ष आहे - मुख्यमंत्री

 • 08:38 PM

  मुंबई - कोरोनाची तिसरी लाट येईल, अशी शक्यता केंद्र सरकारच्या तज्ज्ञांनी वर्तवली आहे, त्यामुळे तिचा सामना करण्यासाठी पूर्वतयारी सुरू - उद्धव ठाकरे

 • 08:38 PM

  मुंबई - महाराष्ट्र १२०० मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मिती करतोय, किमान ३ हजार मेट्रीक टन उत्पादनासाठी प्रयत्न सुरू झालेत - मुख्यमंत्री

 • 08:37 PM

  मुंबई - राज्यात ऑक्सिजन १२०० मे. टन तर मागणी १७०० मे. टन, २०० मेट्रिक टन ऑक्सिजन देण्याची केंद्राकडे मागणी - उद्धव ठाकरे

 • 08:37 PM

  मुंबई - आपण जे काही निर्बंध घातले त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती ती आता थोडी हळू वाढते, धोका कायम आहे - मुख्यमंत्री

 • 08:36 PM

  मुंबई - आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर दिला जात आहे, लसीचा पुरवठा होईल तसे लसीकरण वाढेल - उद्धव ठाकरे

All post in लाइव न्यूज़