Next

सचिन झाला 'गुरू'; शिकवणार क्रिकेटचं तंत्र अन् जगण्याचा मंत्र

इंग्लंडच्या मिडलसेक्स क्लबच्या साहाय्याने सचिनने आपल्या ‘तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादमी’चा शुभारंभ केला असून याद्वारे तो नवोदित खेळाडूंना क्रिकेटचे धडे ...

इंग्लंडच्या मिडलसेक्स क्लबच्या साहाय्याने सचिनने आपल्या ‘तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादमी’चा शुभारंभ केला असून याद्वारे तो नवोदित खेळाडूंना क्रिकेटचे धडे देणार आहे. सचिनने प्रशिक्षक म्हणून आपला बालपणीचा मित्र विनोद कांबळी याच्याकडे जबाबदारी सोपविली आहे. यामुळे सचिन - विनोद या दिग्गज विश्वविक्रमीजोडीकडून शिकण्याची सुवर्णसंधी नवोदित खेळाडूंना मिळेल. यानिमित्ताने  सचिन तेंडुलकरने  ‘लोकमत’शी विशेष संवाद साधला.