Next

स्मृती मानधनाचा स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) २०१८ ची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून गौरविलेल्या महाराष्ट्राच्या स्मृती मानधनाचा 'लोकमत'नं बुधवारी सन्मान केला. ...

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) २०१८ ची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून गौरविलेल्या महाराष्ट्राच्या स्मृती मानधनाचा 'लोकमत'नं बुधवारी सन्मान केला. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात' तिला Sports Person Of The Year पुरस्कारानं गौरविण्यात आले. स्मृतीनं गेल्या वर्षभरात सातत्यपूर्ण कामगिरी करताना आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटूंमध्ये स्वतःचा दबदबा निर्माण केला. तिच्या बिनधास्त, बेधडक फटकेबाजीसमोर प्रतिस्पर्धी गोलंदाज हतबल होतात. अशा स्मृतीला बुधवारी 'लोकमत'नं गौरविले.