Next

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचं स्मशानभूमीत स्वतःला गाडून घेत आत्मक्लेश आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 12:16 PM2018-12-20T12:16:28+5:302018-12-20T12:16:34+5:30

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीत स्वतःला खड्ड्यात गाडून घेऊन बुधवारी सकाळी आत्मक्‍लेश आंदोलन केले. 

बुलढाणा : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीत स्वतःला खड्ड्यात गाडून घेऊन बुधवारी सकाळी आत्मक्‍लेश आंदोलन केले. या वर्षी शासनाने दुष्काळ घोषित केला असला तरी दुष्काळाच्या उपाययोजना अजून जाहीर केल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.