Next

'झक्कास’ अभिनेता करायचा आधी हे काम, नंतर अभिनेत्रींसोबत करु लागला रम्पम...रम्पम….

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 02:34 PM2018-07-25T14:34:54+5:302018-07-25T14:35:26+5:30

प्रत्येक कलाकाराला स्टारडम हे हवं असतं त्याशिवाय त्याची गाडी बॉलिवूडच्या महामार्गावर सुसाट धावूच शकत नाही.....किती तरी येतात आणि जातात...पण ...

प्रत्येक कलाकाराला स्टारडम हे हवं असतं त्याशिवाय त्याची गाडी बॉलिवूडच्या महामार्गावर सुसाट धावूच शकत नाही.....किती तरी येतात आणि जातात...पण स्टारडम मिळवणं हे खूपचं कठीण असतं....त्यामुळे  जे काम मिळेल ते काम सुरूवातीला प्रत्येकालाच करावे लागते. संयम बाळगत अनिल कपूरनेही आपल्या करिअरची सुरूवात कोणत्या बड्या बॅनरच्या सिनेमातून नाहीतर एका शोसाठी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केली होती. स्ट्रगल काळ कुणालाच चुकला नाही... मग या झकास अनिल कपूरलाही तो कसा चुकणार.... मात्र आज  हिरो बनल्यानंतरही याच स्ट्रगल पिरीयडच्या आठवणी त्याच्या मनात आजही ताज्याच आहेत... रिअॅलिटी शो 'फिर भी दिल है हिंदुस्तानी 2' च्या सेटवर दिलखुलास आणि मनमोकळेपणाने तो आपल्या भावना अनिल कपूरने  व्यक्त केल्या आहेत.