Next

संभाजी महाराज जयंती महोत्सवात साध्या पद्धतीने लावला विवाह

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 02:08 PM2019-05-14T14:08:46+5:302019-05-14T14:09:30+5:30

औरंगाबाद - संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज सकाळी जाधववाडी येथील वधू आणि भोकरदन येथील वराने वैवाहिक जीवनाला सुरुवात ...

औरंगाबाद - संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज सकाळी जाधववाडी येथील वधू आणि भोकरदन येथील वराने वैवाहिक जीवनाला सुरुवात केली. टीव्ही सेंटर येथील संभाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या साक्षीने काकासाहेब सुखदेव जीवरग आणि निकिता माधवराव तायडे हे दोघे विवाहबद्ध झाले. दुष्काळी परिस्थितीमुळे अनावश्यक खर्चाला फाटा देऊन शेतकरी कुटुंबाने अत्यंत साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा पार पाडला. यासाठी बुलुंद छावा संघटनेने प्रयत्न केले.