२० राज्यातील कामगार अडकले वाशिम जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 11:27 AM2020-04-03T11:27:28+5:302020-04-03T11:27:34+5:30

- दादाराव गायकवाड लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्रशासनाने ‘लॉकडाऊन’, तर राज्यशासनाने सर्व जिल्ह्यांच्या सीमा ...

Workers in the state are trapped in Washim district | २० राज्यातील कामगार अडकले वाशिम जिल्ह्यात

२० राज्यातील कामगार अडकले वाशिम जिल्ह्यात

Next

- दादाराव गायकवाड
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्रशासनाने ‘लॉकडाऊन’, तर राज्यशासनाने सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे पोटापाण्यासाठी आलेले २० राज्यातील कामगारवाशिम जिल्ह्यात अडकून पडले आहेत. प्रशासनाकडून १ एप्रिलपर्यंत अशा ४८०९ कामगारांची माहिती संकलित करण्यात आली असून, ही संख्या आणखी मोठी असण्याची शक्यता आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतच असल्याने केंद्र आणि राज्य शासनानेही यावर नियंत्रणासाठी कठोर पावले ऊचलली आहेत. त्यात १५ एप्रिलपर्यंत ‘लॉकडाऊन’सह सर्व दळणवळण सेवा (जिवनावश्यक सेवा वगळता) कोणत्याही जिल्ह्यांतून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळेच ऊदरभरणासाठी राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी महामार्गासह विविध कामांसाठी परराज्यातून वाशिम जिल्ह्यात आलेले कामगार अडकून पडले आह्त. प्रत्येक जिल्ह्यात अडकून पडलेल्या अशा कामगारांच्या भोजन आणि निवासाची सोय करण्याची जबाबदारी राज्य शासनाने जिल्हा प्रशासनावर सोपविली आहे. त्यामुळे वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अशा सर्व कामगारांची माहिती संकलित करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्यानंतर प्रशासनाने १ एप्रिलपर्यंत २० राज्यातील ४८०९ कामगारांची माहिती संकलित केली असून, या कामगारांच्या भोजन आणि निवासाची सोय केली आहे. काही कामगारांना शासकीय शाळा, समाजिक सभागृहांत ठेवण्यात आले आहे.

 

Web Title: Workers in the state are trapped in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.