माती परीक्षण, बिज प्रक्रियेसाठी महिलाही सरसावल्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 11:33 AM2020-05-24T11:33:59+5:302020-05-24T11:34:20+5:30

वाशिम जिल्ह्यातील ९२ ग्रामसंघ, १७८६ समूह, कृषी सखी या माती परीक्षण, बिज प्रक्रियेसाठी सरसावल्या आहेत.

 Women also rushed for soil testing and seed processing! | माती परीक्षण, बिज प्रक्रियेसाठी महिलाही सरसावल्या !

माती परीक्षण, बिज प्रक्रियेसाठी महिलाही सरसावल्या !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : खरीप हंगाम तोंडावर असून, शेतकऱ्यांच्या बांधावर खते, बियाणे पोहचविणे, माती परीक्षण, बियाण्यांवर बीज प्रक्रिया करणे आदी शेतीपयोगी कामात महिलाही समोर येत आहे. ‘उमेद’ अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यातील ९२ ग्रामसंघ, १७८६ समूह, कृषी सखी या माती परीक्षण, बिज प्रक्रियेसाठी सरसावल्या आहेत.
कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेत खरीप हंगामाचे पूर्वनियोजन करताना ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन करण्यावर भर दिला जात आहे. कृषी सेवा केंद्रांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी होऊ नये म्हणून यावर्षी शेतकºयांच्या बांधावर खते, बियाणे उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाला वाशिम जिल्ह्यात ‘उमेद’ अभियानातील कृषी सखींच्या सहकार्याची जोड देण्यात आली आहे. जिल्ह्यात ९२ ग्रामसंघ व १७८६ समूह, १०० पेक्षा अधिक कृषी सखी असून शेतकºयांच्या बांधावर खत व बियाणे या उपक्रमात या महिला आपले कर्तव्य बजावत आहेत. कृषी विभागातर्फे कृषी सखींना योग्य ते प्रशिक्षण देण्यात आले. शेतकºयांच्या बियाणे व खते यांच्या नोंदी घेणे, एकत्रित बियाणे व खते खरेदी करणे व त्याची कृषी विभागाने तयार केलेल्या संकेतस्थळवर नोंदी करणे तसेच शेतकºयांच्या शेतीमधून माती परीक्षण नमुने घेणे, गावस्तरावर शेतकºयांच्या बियाण्यांवर बीज प्रक्रिया करणे इत्यादी कार्य उमेद अभियानातील कृषी सखी, समूह व ग्रामसंघातील सदस्य करीत आहेत. कृषी क्षेत्रातही महिला पुढे आल्याने कौतुकाचा विषय बनला आहे.
 

कृषी विभागातर्फे, खरीप हंगमाचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकºयांना बी-बियाणे, खते व अन्य कृषी निविष्ठांची खरेदी करताना अडचणींचा सामना करावा लागू नये तसेच घरगुती बियाणे तयार करताना नेमके काय केले पाहिजे यासंदर्भात कृषी विभागाने उमेद अभियानांतर्गतच्या कृषी सखींना प्रशिक्षण दिले आहे. प्रशिक्षीत झालेल्या या कृषी सखी आता कृषीविषयक कामे सहजरित्या पार पाडत आहेत. शेतकºयांच्या बांधावर खते, बियाणे पोहचविण्याच्या उपक्रमात हिरीरीने सहभागी होऊन नोंदी ठेवत आहेत. इतर क्षेत्राप्रमाणेच कृषीविषयक क्षेत्रातही महिला समोर आल्या आहेत.

Web Title:  Women also rushed for soil testing and seed processing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.