Washim ZP : मिनी मंत्रालयात सत्ता स्थापनेचे ठरले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 03:34 PM2020-01-15T15:34:14+5:302020-01-15T15:34:28+5:30

तिघांनीही मिळून बहुमत सिध्द होत असल्याने व राज्यातही महाविकास आघाडीची सत्ता असल्याने जिल्हा परिषदेत आघाडीची सत्ता स्थापनेबाबत विचार विनिमय करण्यात आला.

Washim ZP: Power set up in mini ministry | Washim ZP : मिनी मंत्रालयात सत्ता स्थापनेचे ठरले 

Washim ZP : मिनी मंत्रालयात सत्ता स्थापनेचे ठरले 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : येत्या १७ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी महाविकास आघाडीतील मित्र पक्षांच्या नेत्यांची सकारात्मक चर्चा होऊन सत्ता स्थापन करण्याचे विश्रामगृहात झालेल्या सभेत ठरले.
महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस व शिवसेना नेत्यांची विश्रामगृहात सभा झाली त्यामध्ये तिघांनीही मिळून बहुमत सिध्द होत असल्याने व राज्यातही महाविकास आघाडीची सत्ता असल्याने जिल्हा परिषदेत आघाडीची सत्ता स्थापनेबाबत विचार विनिमय करण्यात आला. सर्वात मोठा पक्ष असलेल्या उमेदवारास अध्यक्षपद तर त्या खालोखाल असलेल्या पक्षाला उपाध्यक्षपद देण्यावर चर्चा झाली. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस व शिवसेना सत्ता स्थापन होणार असल्याचे महाविकास आघाडीतील नेत्यांच्या चर्चेवरुन दिसून येत आहे.या सभेला यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या खासदार भावनाताई गवळी, रिसोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित झनक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दिलीपराव सरनाईक, राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, राष्टÑवादीचे नेते तथा माजी आमदार प्रकाश डहाके यांचा समावेश होता. सभेत ठरल्यानुसार जिल्हा परिषदेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्टÑवादी काँग्रेस तर त्या पाठोपाठ काँग्रेस असल्याने अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर उपाध्यक्षपद काँग्रेसकडे जाणार आहे. अध्यक्षपदासाठी चंद्रकांत ठाकरे यांच्या एकमेव नावाची चर्चा आहे. शिवसेनेला सभापती पदे दिली जाणार असल्याची माहिती आहे.
एकंदरीत जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी चांगलीच मोर्चेबांधणी होत असली तरी महाविकास आघाडीमधील मित्र पक्षांकडे असलेल्या बहुमतामुळे इतर राजकीय पक्षांच्या मनसुब्यावर पाणी फेरल्याचे दिसून येत आहे.
 
असे आहे पक्षीय बलाबल
काँग्रेस ९, रा.काँ. १२, शिवसेना ६, भाजपा ७, भारिप ८, जनविकास आघाडी ७, स्वाभिमानी पक्ष १ व अपक्ष २.

अध्यक्षपदी चंद्रकांत ठाकरेंची शक्यता
 सभेत ठरल्यानुसार जिल्हा परिषदेतील सर्वात मोठा असलेल्या पक्षाला अध्यक्षपद देण्याच्या निर्णयानुसार राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे अध्यक्षपदी राहणार असल्याची शक्यता आहे.
 महाविकास आघाडीचे जिल्हा परिषदमध्ये सत्ता स्थापन करण्याचे ठरल्याने भाजपा, भारिप, जनविकास आघाडीचे सत्ता स्थापनेबाबतच्या घडामोडी थांबलेल्या दिसून येत आहेत.
 महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये ठरलेल्यानुसार जिल्हा परिषदमध्ये राजकीय पक्षांच्या बळानुसार जागा वाटप होणार त्याचपध्दतीने पंचायत समितीमध्येही पक्षाच्या बळानुसार सत्ता स्थापनेवर चर्चा करण्यात आली.

 

 

 

Web Title: Washim ZP: Power set up in mini ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.