मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाशिम जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 03:33 PM2020-01-14T15:33:02+5:302020-01-14T15:34:30+5:30

अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखडे, पोलीस उपाधीक्षक मृदुला लाड, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सय्यद यांनी हा सन्मान स्वीकारला.

WASHIM District Road Safety Committee honored by CM | मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाशिम जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचा सन्मान

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाशिम जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचा सन्मान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीने विविध उपाययोजना केल्या. त्यामुळे रस्ते अपघात, रस्ते अपघातातील जखमी व मृत्यूंच्या संख्येते घट झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई येथे राज्य रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या उदघाटन कार्यक्रमात वाशिम जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचा सन्मान करण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखडे, पोलीस उपाधीक्षक मृदुला लाड, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सय्यद यांनी हा सन्मान स्वीकारला.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वाशिम जिल्हा रस्ता सुरक्षा समितीने रस्ते अपघातामधील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवून रस्ते अपघात कमी करण्याचा प्रयत्न केला. सन २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये रस्ते अपघात व रस्ते अपघातातील जखमींच्या संख्येत १६ टक्के, रस्ते अपघातातील मृत्यूंच्या संख्येत २३ टक्के घट झाली आहे. रस्ते अपघात व रस्ते अपघातात मृत्यूंची संख्या कमी करण्यामध्ये वाशिम जिल्हा राज्यात दुसºया क्रमांकावर आहे. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या या कामगिरीबद्दल आज राज्य रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या उदघाटन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते समितीचा सन्मान करण्यात आला. समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक व सदस्य यांच्यावतीने अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखडे, पोलीस उपाधीक्षक मृदुला लाड, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सय्यद यांनी हा सन्मान स्वीकारला.

Web Title: WASHIM District Road Safety Committee honored by CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.