पीक विम्याची प्रतिक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 02:12 PM2020-01-06T14:12:32+5:302020-01-06T14:12:38+5:30

कृषी आयुक्तालयात पडताळणीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसल्याने शेतकऱ्यांना विमा भरपाईची प्रतिक्षा कायम आहे.

Waiting for crop insurance | पीक विम्याची प्रतिक्षा कायम

पीक विम्याची प्रतिक्षा कायम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्यात आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानापोटी पीक विमाधारक शेतकऱ्यांना विमा मंजूर करण्यासाठी कृषी विभागामार्फत पंचनामे करून कृषी आयुक्तांकडे अहवाल पाठविला होता; परंतु कृषी आयुक्तालयात पडताळणीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसल्याने शेतकऱ्यांना विमा भरपाईची प्रतिक्षा कायम आहे.
राज्यात माहे आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये ‘क्यार’ व ‘महा’ चक्रिवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुुळे झालेल्या अवेळी पावसामुळे राज्यातील ३४ जिल्ह्यातील ३४९ तालुक्यातील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. या पीक नुकसानापोटी राज्य शासनाने शेतकºयांना आर्थिक मदत करण्यासाठी दोन टप्प्यांत निधी वितरणास मंजुरी दिली आणि नुकसानग्रस्त शेतकºयांना शेतीपिकांसाठी हेक्टरी ८ हजार आणि फळबागांसार्ठी हेक्टरी १८ हजार रुपये प्रमाणे मदतीचे वितरणही करण्यात आले. तथापि, क्यार’ व ‘महा’ चक्रिवादळामुळेच नुकसान झालेल्या पीकविमाधारक शेतकºयांना अद्यापही पीकविम्याचा लाभ मिळालेला नाही. या शेतकºयांना पीकविम्याचा लाभ देण्यासाठी अ‍ॅग्रीकल्चर इन्शूरन्स कंपनी आॅफ इंडियाच्यावतीने निर्धारित निकषानुसार शेतकºयांच्या नुकसानाचा अहवाल मागविला, तसेच प्रत्यक्ष नुकसान झालेल्या पिकांची छायाचित्रेही मागविली. यानुसार सर्व संबंधित कृषी अधिकाºयांमार्फत सर्वकश अहवालासह शेतकºयांच्या नुकसानाची छायाचित्रे कृषी आयुक्तालयाकडे पाठविली. आता या अहवालासह छायाचित्रांची पडताळणी कृषी आयुक्तांमार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे अद्यापही पीकविमा कंपनीकडे अंतिम अहवाल पोहोचला नसल्याने शेतकºयांना पीकविम्याची प्रतिक्षाच आहे.

Web Title: Waiting for crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.