वाशिम जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू; ४२४ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 10:53 AM2021-05-04T10:53:47+5:302021-05-04T10:53:56+5:30

Corona Cases in Washim : आणखी दोन जणांचा मृत्यू तर ४२४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ३ मे रोजी पॉझिटिव्ह आला.

Two more killed in Washim district; 424 corona positive | वाशिम जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू; ४२४ कोरोना पॉझिटिव्ह

वाशिम जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू; ४२४ कोरोना पॉझिटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी दोन जणांचा मृत्यू तर ४२४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ३ मे रोजी पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २८,९९२ वर पोहोचला आहे.
गतवर्षी ३ एप्रिल रोजी जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हावासीयांची चिंताही वाढली आहे. वाशिम शहरासह तालुक्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने शहरवासीयांनी आतातरी सतर्क होणे आवश्यक ठरत आहे. सकाळच्या सुमारास बाजारपेठेत गर्दी होत असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. सोमवारी प्राप्त अहवालानुसार आणखी दोन जणांचा मृत्यू झाला तसेच ४२४ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. वाशिम शहरातील ७५ आणि तालुक्यातील ६४ असे एकूण १३९, मालेगाव शहरातील पाच आणि तालुक्यातील ४८ असे एकूण ५३, रिसोड शहरातील ४५ आणि तालुक्यातील ७७ असे एकूण १२२, मंगरूळपीर शहरातील १४ आणि तालुक्यातील ३८ असे एकूण ५२, कारंजा शहरातील १४ आणि तालुक्यातील १८ असे एकूण ३२ आणि मानोरा शहरात एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. ५०३ जणांनी कोरोनावर मात केली. 

Web Title: Two more killed in Washim district; 424 corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.