वाशिम जिल्ह्यात आणखी तिघांचा मृत्यू; ९० कोरोना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 12:54 PM2020-10-19T12:54:44+5:302020-10-19T12:54:48+5:30

Washim district CoronaVirus News आणखी तिघांचा मृत्यू झाल्याची नोंद १८ ऑक्टाेबर रोजी घेण्यात आली

Three more killed in Washim district; 90 corona positive | वाशिम जिल्ह्यात आणखी तिघांचा मृत्यू; ९० कोरोना पाॅझिटिव्ह

वाशिम जिल्ह्यात आणखी तिघांचा मृत्यू; ९० कोरोना पाॅझिटिव्ह

Next

वाशिम : जिल्ह्यात मृत्यूसत्र सुरूच असून, आणखी तिघांचा मृत्यू झाल्याची नोंद १८ ऑक्टाेबर रोजी घेण्यात आली तर दिवसभरात ९० नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ५३८२ झाली आहे. दरम्यान २२ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रविवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. 
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट येत असल्याचे दिसून येते. मात्र, मृत्यूसंख्या वाढत असल्याने जिल्हावासियांची चिंता कायम आहे. १८ ऑक्टोबर रोजी दिवसभरात ९० जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील काळे फाईल येथील १, सुंदरवाटिका येथील २, अल्लाडा प्लॉट येथील २, गांधी चौक येथील १, रेनॉल्ड हॉस्पिटल परिसरातील १, मोठा उमरा येथील १, अनसिंग येथील १, तांदळी येथील २, काटा येथील ७, शेलू बुद्रुक येथील १, बोरखेडी येथील २, कोकलगाव येथील १, कोंडाळा झामरे येथील १०, अडोळी येथील २, जांभरुण नावजी येथील २, रिसोड शहरातील पंचवट गल्ली येथील १, जुनी सराफा लाईन येथील ५, सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील २, शहरातील इतर ठिकाणचे ४, बाळखेड येथील ५, गोंढाळा येथील ३, लोणी येथील २, येवती येथील १, व्याड येथील १, सवड येथील १, हराळ येथील ३, मोठेगाव येथील १, हिवरा पेन येथील १, मानोरा तालुक्यातील कोंडोली येथील ३, मालेगाव शहरातील वार्ड क्र. सतरा येथील २, वार्ड क्र. एक येथील १, वार्ड क्र. तीन येथील १, अकोला नाका येथील २, जऊळका येथील २, नागरतास येथील १, मंगरूळपीर शहरातील १, वसंतवाडी येथील १, पार्डी ताड येथील १, कारंजा लाड शहरातील इंदिरा नगर येथील १, शेवती येथील २, काजळेश्वर येथील २, सिरसोळी येथील ३, रहाटी येथील १ अशा एकूण ९० जणांचा समावेश आहे. आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५३८२ वर पोहचली आहे. यापैकी ४५६२ जणांनी कोरोनावर मात केली.

Web Title: Three more killed in Washim district; 90 corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.