पंचनाम्यासाठी उरले तीन दिवस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 12:19 PM2019-11-06T12:19:38+5:302019-11-06T12:19:51+5:30

पंचनामे झालेली गावे आणि शेतकऱ्यांची यादी ग्रामपंचायतींच्या फलकावर लावण्यात येत आहेत.

 Three days left for Panchanama! | पंचनाम्यासाठी उरले तीन दिवस!

पंचनाम्यासाठी उरले तीन दिवस!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी शासनाने ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. ही प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे केवळ तीन दिवस उरले आहेत. त्यामुळे कृषी व महसूल विभागासह पंचायत विभागाची धावपळ सुरु झाली आहे. दरम्यान, पंचनामे झालेली गावे आणि शेतकऱ्यांची यादी ग्रामपंचायतींच्या फलकावर लावण्यात येत आहेत. त्यामुळे वंचित शेतकऱ्यांना त्याची माहिती मिळून ते नुकसानाबाबत प्रशासनाला अवगत करु शकणार आहेत.
जिल्ह्यात गत आठवड्यात अवकाळी पावसाने अक्षरश: थैमान घातले. त्यामुळे शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीनसह उभे सोयाबीन, तूर, कपाशी आदि पिकांचे मोठे नुकसान झाले. लाखो हेक्टर क्षेत्रातील शेतजमिनीत पाणीच पाणी दिसू लागले. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनाने प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. सुरुवातीचे दोन दिवस तक्रार अर्जांचे संकलन करण्यातच गेले, तर त्यानंतर पावसामुळे शेतशिवारात चिखल झाल्याने पंचनाम्यात अडथळे निर्माण झाले. आता ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी यांचे संयुक्त पथक पीक नुकसानाची पाहणी करीत आहे. जिल्ह्यात २ लाख ९५ हजार २९० शेतकºयांनी पीक विमा काढला. त्यात १ लाख ३० हजार ७५६ शेतकरी सोयाबीन उत्पादक आहेत. या शेतकºयांनी १ लाख ३७ हजा २४ हेक्टर क्षेत्रासाठी पीकविमा भरला आहे, तर त्यापैकी १ लाख ९ हजार ६०६ शेतकºयांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाबाबत अर्ज केले आहेत. प्रत्यक्षात जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमध्य ८०२ गावातील पिकांचे नुकसान झाले असून, त्यापैकी मंगळवार ५ नोव्हेंबरपर्र्यंत प्रशासनाने ३५२ गावांतील ९५ हजारांहून अधिक शेतकºयांच्या नुकसानाचे पंचनामे केले आहेत. तथापि, हे पंचनामे करण्यासाठी शासनाने ८ नोव्हेंबरपर्यंतचीच मुदत दिली असल्याने आता तीन दिवसांत ४५० गावांत पोहोचून पंचनामे करावे लागणार असल्याने प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. आता तीन दिवसांत कुठल्याही परिस्थितीत प्रशासनाला पंचनामे करावे लागणार आहेत. यात वेळ जाऊ नये म्हणून प्रशासन एका गावातील दहा ते पंधरा शेतकºयांच्या काढणी पश्चात सोयाबीनचा पंचनामा करून तो एकाच कागदावर नमूद करीत त्यावर संबंधित सर्व शेतकºयांची स्वाक्षरी घेत आहे. दरम्यान, प्रशासनाच्यावतीने पंचनामे झालेल्या गावांतील शेतकºयांची यादी संबंधित ग्रामपंचायत कार्यालयाच्या दर्शनी भागांत फलकावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. यामुळे ज्या शेतकºयांचे पंचनामे झालेले नाहीत, अशा शेतकºयांना प्रशासनाला आपल्या पीक नुकसानाबाबत अवगत करून पंचनामे करून घेता येणार आहेत.
(प्रतिनिधी)

शासनाच्या निकषानुसार प्रत्येक शेतकºयाच्या शेतात नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी प्रशासनाचे पथक जात आहे. काही शेतकºयांच्या मनात सुरू असलेल्या नुकसानाच्या पंचनाम्याबाबत संभ्रम आहे; मात्र ही प्रक्रिया निप:क्षपणे केली जात असून कुणाला काही शंका असल्यास त्यांनी पथकाला भेटून शंका निरसन करावे.
- शंकर तोटावार
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी


जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाचे पंचनामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. पंचनामे निर्धारित मुदतीत करण्यापेक्षा कोणताच नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, ही काळजी घेणे महत्वाचे आहे. मनुष्यबळ अपुरे असताना नियोजनबद्ध पद्धतीने पंचनाम्याची प्रक्रिया पार पडत आहे.
- शैलेश हिंगे
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम


अवकाळी पावसामुळे सोयाबीनच्या सुड्या पूर्णत: भिजल्या असून, अधिक दिवस उलटल्याने सुड्यांमधील हे सोयाबीन आता सडत चालले आहे. असे असताना अनेक ठिकाणी पंचनामे झाले नसल्याने सोयाबीन उचलावे की नाही, हा प्रश्न आहे. प्रशासनाने सोयाबीनच्या सुड्यांचा तातडीने पंचनामा करायला हवा.
- शाम अवताडे
शेतकरी, जोगलदरी (ता.मंगरूळपीर)

 

Web Title:  Three days left for Panchanama!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.