कोरोना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात ५० खाटांची व्यवस्था !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 11:29 AM2020-04-03T11:29:24+5:302020-04-03T11:29:33+5:30

५० खाटांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.

Three beds in District General Hospital for corona treatment! | कोरोना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात ५० खाटांची व्यवस्था !

कोरोना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात ५० खाटांची व्यवस्था !

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील ३० शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून २ एप्रिल रोजी घोषीत केली आहेत. यामध्ये वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयाचा समावेश असून, येथे ५० खाटांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. येथे केवळ कोरोना रुग्णांवर उपचार केले जातील.
कोरोना विषाणू संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेता राज्य सरनकारतर्फे आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. रुग्णांवर तातडीने उपचार मिळावे याकरीता २ एप्रिल रोजी राज्यातील ३० शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था केली जाणार असून, त्यासंदर्भात अधिसूचना काढण्यात आली. या अधिसूचनेमुळे या रुग्णालयांना संशयित आणि कोरोना निदान झालेल्या रुग्णांना केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार करणे बंधनकारक असणार आहे. वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात संशयित व बाधित कोरोना उपचारासाठी ५० खाटांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Three beds in District General Hospital for corona treatment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.