विनाअनुदानित शिक्षकांच्या समर्थनार्थ शिक्षकांचे घंटानाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:42 AM2021-03-05T04:42:00+5:302021-03-05T04:42:00+5:30

मुंबई येथील आझाद मैदानात २९ जानेवारी पासून राज्यातील विनाअनुदानित शिक्षक हजारोंच्या संख्येने आंदोलन करीत आहेत. घोषित शाळांना २० टक्के, ...

Teachers' bell ringing movement in support of unsubsidized teachers | विनाअनुदानित शिक्षकांच्या समर्थनार्थ शिक्षकांचे घंटानाद आंदोलन

विनाअनुदानित शिक्षकांच्या समर्थनार्थ शिक्षकांचे घंटानाद आंदोलन

Next

मुंबई येथील आझाद मैदानात २९ जानेवारी पासून राज्यातील विनाअनुदानित शिक्षक हजारोंच्या संख्येने आंदोलन करीत आहेत. घोषित शाळांना २० टक्के, २० टक्के अनुदानित शाळांना ४० टक्के अनुदान द्यावे. अघोषित शाळा अनुदानासह घोषित कराव्यात, प्रचलित नियमानुसार अनुदान द्यावे, संपूर्ण सेवा सरंक्षण द्यावे, वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेचा लाभ द्यावा, आदि मागण्यांसाठी त्यांचे आंदोलन चालू आहे. या आंदोलनात महिला शिक्षकांची संख्या देखील लक्षणीय असून, लहान मुले घेऊन त्या आंदोलनात सहभागी आहेत. आजवरच्या आंदोलनात सत्ताधारी व विरोधी पक्षातील अनेक मान्यवरांनी आंदोलन स्थळी भेट दिली व आंदोलनकर्त्या शिक्षकांसोबत संवाद साधून तुम्हाला नक्कीच न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले; परंतु महिना उलटला तरी यावर कोणताच काहीच निर्णय झाला नाही. आंदोलन करणाºया अनुदानित शिक्षकांना पाठींबा देण्यासाठी गुरुवारी वाशिम जिल्ह्यातील सर्व संस्थाचालक, मुख्याध्यापक संघ, सर्व अनुदानित शिक्षक संघटना व विद्यार्थ्यांनी सोशल डिस्टन्सिगचे पालन करावे, असे अवाहन शिक्षक समन्वय संघाने केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हाभरातील शिक्षक संघटना आणि विद्यार्थ्यांनी घंटानाद आंदोलन केले.

===Photopath===

040321\04wsm_2_04032021_35.jpg

===Caption===

शिक्षकांचे घंटानाद आंदोलन

Web Title: Teachers' bell ringing movement in support of unsubsidized teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.