महाबीजचे सोयाबीन बीजोत्पादन घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 12:21 PM2020-02-19T12:21:29+5:302020-02-19T12:21:38+5:30

उद्दिष्ट १ लाख ८० हजार क्विंटल असताना २ लाख १३ हजार क्विंटल उत्पादन झाले.

The soybean seed production of mahabeej declined | महाबीजचे सोयाबीन बीजोत्पादन घटले

महाबीजचे सोयाबीन बीजोत्पादन घटले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: सन २०१९ मध्ये वाशिम जिल्ह्यात पावसाळ्याच्या मध्यंतरी झालेला जोरदार पाऊस आणि नोव्हेंबर, डिसेंबरमधील अवकाळी पावसाचा परिणाम महाबीजच्या बिजोत्पादनावर झाला आहे. सोयाबीनसह उडीद, मुगाचे उत्पादन घटल्याने यंदा बाहेरच्या खासगी बियाण्यांचा आघार घ्यावा लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वाशिम जिल्ह्यात गतवर्षी महाबीजचे सोयाबीन बियाण्यांचे उत्पादन उद्दिष्ट १ लाख ८० हजार क्विंटल असताना २ लाख १३ हजार क्विंटल उत्पादन झाले. यंदा मात्र निर्धारित उद्दिष्टापेक्षा बिजोत्पादनात घट आली आहे. यंदाच्या खरीप हंगामात बिजोत्पादन प्रकल्पांतर्गत १० हजार ८३२ हेक्टरवर सोयाबीनची, २६० हेक्टरवर उडिदाची पेरणी झाली होती. यापैकी सोयाबीनच्या बिजोत्पादनातून १ लाख ४९ हजार क्विंटल बियाणे ऊत्पादनाचे ऊद्दिष्ट होते. तथापि, सोयाबीनच्या काढणीदरम्यान नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये जेरदार अवकाळी पाऊस आल्याने महाबीजच्या बिजोत्पादनावर परिणाम झाला. यंदा निर्धारित १ लाख ४९ हजार क्विंटलच्या तुलनेत सोयाबीनचे केवळ १ लाख ४२ हजार ८०० क्विंटल ऊत्पादन झाले. अर्थात यंदा सोयाबीन बिजोत्पादनात ६ हजार २०० क्विंटलची घट आली. त्याशिवाय ऊडिद आणि मुगाच्या बियाण्यांचे उद्दिष्ट किमान ४०० क्विंटल असताना या दोन्ही पिकाचे मिळून केवळ १३२ क्विंटल बियाणे उत्पादित होऊ शकले. त्यामुळे आगामी बंगामात बियाण्यांची पूर्तता करण्यासाठी महाबीजला खासगी कंपन्यांचा आधार घ्यावा लागण्याची शक्यता आहे.


सोयाबीन बियाण्यांचे ६६७ नमुने सदोष
महाबीजच्या बिजोत्पादन प्रकल्पांतर्गत ३२६५ शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती. त्या सर्व शेतकऱ्यांच्या सोयाबीन बियाण्यांचे नमुने गुणनियंत्रक प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आले. त्यापैकी ६६७ शेतकºयांच्या सोयाबीन बियाण्यांचे नमुने सदोष आढळून आले. अर्थात त्यांच्या बियाण्यांची उगवण क्षमता निर्धारित प्रमाणापेक्षा खूप कमी असल्याचे सिद्ध झाले.


अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे बिजोत्पादनावर परिणाम झाला आहे. तथापि, झालेल्या ऊत्पादनातून बियाणे मागणीची पूर्तता करणे कठीण जाणार नाही. गरज पडली तरच खासगी कंपन्याचा आधार घ्यावा लागेल.
- डॉ. प्रशांत घावडे.
जिल्हा व्यवस्थापक
महाबीज, वाशिम

Web Title: The soybean seed production of mahabeej declined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.