वसंतराव नाईकांना भारतरत्न पुरस्कार देण्याच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 03:26 PM2018-12-22T15:26:49+5:302018-12-22T15:26:57+5:30

मानोरा :  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांना केंद्रशासनाने भारतरत्न पुरस्काराने सन्मानीत करावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतिने  माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे  यांच्या नेतृत्वात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. 

Signature campaign for the demand of Bharat Ratna for Vasantrao Naik | वसंतराव नाईकांना भारतरत्न पुरस्कार देण्याच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम

वसंतराव नाईकांना भारतरत्न पुरस्कार देण्याच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा :  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांना केंद्रशासनाने भारतरत्न पुरस्काराने सन्मानीत करावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतिने  माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे  यांच्या नेतृत्वात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. 
 ज्या शाळेत वसंतराव नाईक यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. त्या शाळेत जावुन वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे पुजन व हारार्पण करुन स्वाक्षरी मोहीमेला सुरुवात करण्यात आली. मानोरा शहरातील दिग्रस चौकात भर बाजारात नागरिकांच्या स्वाक्षºया घेण्यात आल्या. या मोहीमेचे नागरिकांनी स्वागत करत या मोहीमेला पाठींबा दर्शविला.  ही मोहीम अधिक व्यापक करु, तालुका भर राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. प्रत्येक गावाच्या आठवडी बाजारात जावुन स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येईल असे यावेळी मान्यवरांच्यावतिने सांगण्यात आले.  यावेळी माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, तालुकाध्यक्ष यशवंतराव इंगळे, जि.प.सदस्य सचिन रोकडे, राजु गुल्हाणे, उपसभापती रजनी गावंडे, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संजय भुजाडे,  नानासाहेब पाटील, प्रभाकर भोयर, पं.स.सदस्य रुखमा हनवते, गजानन भवाने, विलास आडे, निलेश पाटील, देवनाथ भोयर, गोपाल भोयर, माजी जि.प.सदस्य सुधीर पाटील आदि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)

Web Title: Signature campaign for the demand of Bharat Ratna for Vasantrao Naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.